JOIN DFWMM group by clicking icon from your phone 

मराठी लघुपट महोत्सव

Fun Asia Richardson 1210 E Belt Line Rd Richardson, TX

नमस्कार मंडळी, 

आपल्या मायभूमीने अनेक दिग्गज, कर्तृत्ववान तयार केले. मराठी माणसाने कलाक्षेत्रात, व्यवसायात यशाची शिखरे पादाक्रांत केली. आपल्याकडे येत असलेलं सुपर हिट नाटक आपल्याला याची छान प्रचीती देऊन जाईलच.

या सगळ्याची सुरवात, या सगळ्याचा पाया एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात काही नामवंतांनी रचला.  अशाच काही प्रख्यात व्यक्ती आणि कलेसाठी सुवर्ण युग ठरलेल्या काळाची छानशी ओळख करून देण्यासाठी सादर करीत आहोत 'लघुपट महोत्सव'. 

शनिवार दि २९ ऑगस्ट २०१५ ला दुपारी १२ ते ५ असा हा सोहळा असेल. 

१ डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व - एकोणिसाव्या शतकात स्त्रियांनी  शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. अशा काळात आनंदीबाई अमेरिकेत आल्या, एम.डी. झाल्या. त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची झलक. 

२. संगीताचे सुवर्ण युग (१८५०-१९५०) - हिंदुस्थानी संगीताचा हा मंगल कलश आपल्या मातीत कसा बहरला याचे हे सुरेख वर्णन.

३. गानयोगी : पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर: ग्वाल्हेर घराण्यातील सुरेल आणि मधूर आवाजाचे थोर गायक 

आपली ही संस्कृती जतन करणे, तो काळ आणि कार्य लोकांपुढे आणण्यासाठी अथक प्रयत्न करणारे एक व्यक्तिमत्व आहे, डॉ. अंजली कीर्तने. डॉ. अंजली यांनी लघुपटांच्या माध्यमातून कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वे आणि त्यांचे कार्य, मराठी सांस्कृतिक वारसा यांचे जतन करण्याचा वसा घेतला आहे. त्या स्वत: यासंबंधी चार शब्द सांगण्यासाठी हजर असणार आहेत. तेव्हा, आपण सर्वांनी हे लघुपट आवर्जून पाहावेत. 

आपल्या 'सोशल कॅलेंडर्स' वर नोंद करून ठेवायला विसरू नका, शनिवार दि २९ ऑगस्ट २०१५ ला दुपारी १२  वाजता  'लघुपट महोत्सव'.

Online ticket sale is now closed. Tickets will be available at the door for $8. 

 

लघुपटांविषयी, थोडं विस्तारानं: 

 

१. डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व 

   एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. सातव्या आठव्या वर्षी त्यांचे विवाह होत. परदेशगमन त्यांच्यासाठी निषिद्ध होते. अशा काळात आनंदीबाई एकट्या अमेरिकेत गेल्या आणि एम.डी. झाल्या. त्यांच्या खडतर प्रवासाची ही कहाणी. 

२. संगीताचं सुवर्णयुग (१८५०-१९५०)

ग्वाल्हेर, किराणा, जयपूर, आग्रा यांसारखी हिंदुस्थानी संगीतातील घराणी महाराष्ट्रात स्थलांतरित झाली, विकास पावली. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे यांच्यासारख्या थोर गायकांनी हिंदुस्थानी संगीताचा हा मंगल कलश महाराष्ट्रात आणला. बालगंधर्व, सवाई गंधर्व, केशवराव भोसले यांच्यासारख्या कसदार गायक-नटांमुळे नाट्यसंगीत बहरलं. अशा या सुंदर पर्वाचा वेध या लघुपटात घेतला गेला आहे. 

३. गानयोगी : पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर 

ग्वाल्हेर घराण्यातील थोर गायक विष्णू दिगंबरांचे सुपुत्र पं. दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांच्या जीवनावरील ही सुरेल कहाणी. पलुस्करांनी बारा वर्षे रोजनिशी लिहिली. त्या रोजनिशांचं सखोल संशोधन, ज्या ज्या गावांचा पलुस्करांचा संबंध आला त्या ठिकाणी जाऊन तिथले संदर्भ, ज्या व्यक्तींचा त्यांच्याशी संपर्क आला त्यांच्या मुलाखती, दुर्मिळ दस्तावेज, छायाचित्रे आणि अर्थातच त्यांचे संगीत या सर्वांतून हा लघुपट उभा राहिला आहे. गंधार देशपांडे, शार्दूल कुलकर्णी, स्वरांगी मराठे, चारुदत्त आफळे, रमा जोशी यांच्यासारख्या कलाकारांनी यात विविध व्यक्तिमत्वे साकार केली आहेत. 


अशा व्यक्तींचे कार्य पाहूनच पुढील पिढी प्रेरणा घेत असते. त्यामुळे ही संस्कृती जतन करणे, त्यांचे कार्य लोकांपुढे आणणे हे महत्वाचे आहे. यासाठी अथक प्रयत्न करणारे एक व्यक्तिमत्व आहे, डॉ. अंजली कीर्तने. डॉ. अंजली यांनी लघुपटांच्या माध्यमातून कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वे आणि त्यांचे कार्य , मराठी सांस्कृतिक वारसा यांचे जतन करण्याचा वसा घेतला आहे. 

डॉ. कीर्तने यांनी कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना, पदरमोड करून, प्रसंगी कर्जे घेऊन हे व्रत पुरे केले आहे. केवळ हा आपला वारसा टिकावा म्हणून, पुढील पिढीला त्याचे मार्गदर्शन असावे म्हणून. त्या स्वत: यासंबंधी चार शब्द सांगण्यासाठी हजर असणार आहेत. तेव्हा, आपण सर्वांनी हे लघुपट आवर्जून पाहावेत. कुणी सांगावं, पालकांना आपल्या मुलांतील पूर्वी न दिसलेले कलागुण, व्यक्त न झालेल्या महत्वाकांक्षा दिसतील आणि आपल्या इथल्या मुलांतूनच डॉ. आनंदीबाई जोशी पुन्हा जन्म घेतील, पलुस्करबुवा अवतीर्ण होतील.