JOIN DFWMM group by clicking icon from your phone 

Aayushyavar Bolu Kahi

Coppell Public Library, 177 N Heartz Rd, Coppell, TX 75019

Thanks everyone for making this event a huge success!
DFWMM Volunteer Photographers Team has done an excellent job of capturing the fun memories for us. 

Click here for the Pictures...

'आयुष्यावर बोलू काही'
 
मंडळी, आपल्या गेल्या महिन्यातील सहलीला, उत्साहाने येऊन साथ दिलीत याबद्दल धन्यवाद! तुम्हा सर्वांच्या त्या उत्साहाला भरते आले होते, ते पाहून आम्हा सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. आणि ह्याच नव्याने झालेल्या मैत्रीचे आणि जुन्या मैत्रीचे बंध पुन्हा एकदा घनिष्ट व्हावे ह्याच एका हेतूने नोव्हेंबरच्या १७ तारखेला आम्ही तुमच्या साठी एक नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम योजिला आहे. कार्यक्रमाचे नाव आहे, 'आयुष्यावर बोलू काही'.
 
आपण सारे जेंव्हा मागे वळून आपल्या जीवनाचा आढावा घेतो, तेंव्हा अशा कित्येक गोष्टी किंवा प्रसंग आपल्या डोळ्या पुढून जातात, की ज्या आपल्याला इतरांना सांगाव्याशा वाटतात. बऱ्याच वेळा त्या एका प्रसंगाने आपल्या जीवनाला एक वेगळेच वळण लागते! तर असा एखादा प्रसंग आपण एकमेकांना सांगायचा! यामागचा आणखी एक हेतू हा की आपल्यातील हा अनमोल नव्या मैत्रीचा धागा घट्ट होईल. (तुमच्या वाचण्यांत आलेले साहित्य, किंवा कविता असल्या तरी चालतील. प्रत्येकाला ५ ते ६ मिनिटे दिली जातील.) चला तर मग कागद आणि लेखणी उचला आणि उत्साहाने तयारीला लागा. वश्य यावे! आमचे गत्याचे बोलावणे आहे. विशेष करून आमच्या भारतीय मित्र मैत्रिणींना भेटण्याची हि शेवटची संधी असेल.
 
अशा ह्या साध्या सुध्या कार्यक्रमाला गरमागरम चहा आणि 'पार्लेजी' बिस्किटांची साथ!
ही दुपार मस्त खुलणार याबद्दल शंकाच नाही... तर मग भेटूच आपण सर्वजण १७ नोव्हेंबरला.