Connect with us on social media

Natyachand Ekankika Mahotsav

 
नमस्कार मंडळी,
मराठी माणसाचं रंगभूमीशी एक वेगळंच नातं आहे..हे नातं मराठी नाटकांच्या विषयासारखंच…कधी रोमॅंटिक सुखांतिका, कधी फार्सिकल विनोदिका, कधी सुमधुर संगीतिका आणि कधी काळजाचा ठाव घेणाऱ्या ट्रॅजिक शोकांतिकासुद्धा..हीच रंगीबेरंगी नाती जपायला, खास डॅलसच्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच सादर करतोय- 'नाट्यछंद एकांकिका महोत्सव.
 
तुमच्यातल्या हरहुन्नरी लेखक, दिग्दर्शक, कलाकारांची एकांकिकेच्या स्क्रिप्ट्स वाचायला, तालमीचे बेत आखायला सुरुवात झाली असेल. या कार्यक्रमात एकांकिका सादर करण्यासाठी विषय किंवा शैलीची कोणतीच अट नाही पण- 
१. एकांकिका मराठीत असाव्यात आणि त्यात किमान २ कलाकार आणि एकूण निर्मितीत ६ जणांचा समावेश असावा.
२. एकांकिका ३० ते ५० मिनिटांच्या असाव्यात
३. एकांकिका सादर करायला लेखकाची परवानगी आवश्यक आहे
४. ज्युरी अवॉर्ड्स आणि विशेष बक्षिसं नक्कीच असणार आहेत
 
विशेष विनंती:  कथाकथन, नाट्यवाचन, एकपात्री अभिनय, मूकनाट्य असे कलाविष्कार भविष्यात आपण सादर करूच, पण तूर्तास फक्त एकांकिका!
 
तुमची एकांकिका महोत्सवात सादर करण्यासाठी भरायचा अर्ज https://dfwmm.org/content/2021-2022-naatyachhand   उपलब्ध आहे.
 
अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२१. 
तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला [email protected] वर संपर्क करा.