Connect with us on social media

Diwali Pahat

'दिवाळी' किंवा 'दीपावली' असा शब्द जरी कानावर पडला तरी त्या आवडत्या सणाच्या वर्षानुवर्षाच्या आठवणींनी आनंदायला होतं. परदेशात आल्यावर आपण दिवाळी साजरी करतो खरी, पण त्यात अभ्यंग स्नान, पहाटेचे कार्यक्रम आणि सोहळे, दीपोत्सव, फटाके, मित्र-परिवाराबरोबर केलेला फराळ याची मजा येत नाही ही रुखरुख राहतेच!
हेच जाणवलं आणि म्हणून मंडळाने यंदा दिवाळीत काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय- सुरांची, फराळाच्या गोडीची, आठवणींची जोड असणारं!! उत्सुकता वाढली ना??? 

 

...अजून माहिती लवकरच कळवू! अशीच भेट देत रहा!!