Happy Makar Sankrant मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

Hurry up and purchase event tickets. Most events are FREE for members.

शिवजयंती

शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भूमंडळी||

 

डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळ गर्जले - जय भवानी! जय शिवाजी!

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, शिवाजीमहाराजांच्या गड किल्ल्याच्या सान्निध्यात बालपण गेल्यामुळे आपल्या लहानपणी आपल्याला कधी कोणाला महाराजंची ओळख करून द्यावी लागली नाही. ते तर आपल्या हृदयात वसतात. पण मायभूमीपासून इतक्या दूर, वेगळ्या संस्कृतीत वाढणारी आपली ही मुले यांना शिवबांचा, त्यांच्या गुणांचा विसर पडता कामा नये, असा सगळा विचार घेऊन डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या २०१५-१६ कमिटीने प्रथमच शिवजयंती साजरा करायचा निर्धार केला.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे दिनांक २६ मार्च या शिवजयंतीच्या दिवसाचे औचित्य पाळून सोहळा साजरा झाला. प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळीचे दृश्य अप्रतिम होते. कार्यकर्ते, बाल -प्रौढ कलाकार, अतिथी यांचा उत्साह अवर्णनीय होता. शिवकालीन वेशभूषा करून उभी राहिलेल्या त्या मुलांच्या मुखातून "जय भवानी! जय शिवाजी!" असे शब्द गरजले आणि वातावरण भारून गेलं. अवघ्या दोनतीन वर्षाचा एक मुलगा  तानाजीच्या वेषात ढाल तलवार घेऊन उभा राहतो, आणि छाती पुढे काढून "मी तानाजी! आधी लगीन कोंडाण्याचं, आणि मग रायबाचं!" असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या मागे "गड आलाssss, पण माझा सिंह  गेलाsss! जगदंब! जगदंब!" असं म्हणत प्रत्यक्ष शिवबाच उभे राहिले आहेत असं वाटतं. शिवकालीन वेषभूषा केलेल्या काही चिमुरड्यांनी शिवबा हे काय व्यक्तिमत्व होते हे अस्खलित मराठीत सांगितलं. एरवी लाजत मराठी बोलणाऱ्या या मुलांनी अफजलखान वधाचं वर्णन करताना मराठी हीच आपली पहिली भाषा असल्याची खात्री आपल्या आईवडिलांना करून दिली. कोण म्हणतं मराठीला घरघर लागली आहे? असं भारावलेल्या अवस्थेत असतानाच ढोलताशांचा कडकडाट कानावर आला. शिवबांची छबी बरोबर घेऊन मावळे छाती पुढे काढून चालले आहेत, काही त्या कडकडाटाच्या तालावर बेभान होऊन पदन्यास करीत आहेत. मावळ्यांच्या त्यांच्याइतक्याच शूरवीर कारभारणी अस्सल मराठमोळ्या वेषात मिरवणुकीत फुगड्या घालताहेत, भगवे झेंडे आकाशात उंचावले जाताहेत, ढोलकऱ्यांची बोटं रक्ताळली तरी त्याची पर्वा न करता ते वाजवताहेत, सगळं वातावरणच कसं विद्युतभारित झालं आहे. माय भवानी! तुझ्या कृपेनच हा दिवस आम्हाला दिसला आहे.

या कार्यात सगळ्यांनी अगदी मावळे होऊन झपाटून काम केलं. हा सोहळा सफलपणे पार पाडण्यामध्ये गौरांग  धारप, महेश रुईकर, प्रसाद पारसकर, शैलेश पोतदार, यशिका नाबर, अद्विका जगताप, मृण्मयी जाना, प्राजक्ता बोंगीरवार, आशीष कोगनोळकर, सद्भाव नातू, अनुप शहापूरकर, ओमकार पोटे, आदित्य जोशी, श्रुती कोगनोळकर, नम्रता जगताप, प्रिया खरे, देवकी पांडे, शुभदा देशपांडे, अनघा आगाशे, सई जोशी, रोहिणी राऊत, मुग्धा खाडे, मंजु रुईकर, अनुजा साठे, परम नातू, निखिल पोटभरे आणि कमिटी सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर  सात आठ  वर्षांचा एक मुलगा येऊन आपल्या वडिलांना जेव्हा सांगतो, "बाबा, मला शिवाजीमहाराज आवडले!" तिथंच या कार्यक्रमाचं सार्थक झालं. ही महाराजांच्या कार्याची पुण्याई!
 
जय भवानी! जय शिवाजी!


या कार्यक्रमाची काही छायाचित्र मंडळाच्या Facebook पेजवर उपलब्ध आहेत. 

When: March 26th 3:00pm - 6:00 pm

Location : DFW Hindu Temple 

Cost: FREE event for Members and NON Members (RSVP is required

 

When: 
Saturday, March 26, 2016 - 3:00pm

1605 N Britain Rd, Irving, TX 75061

[2020-2021] SANKRANT
Price

Yugpurush - Swami Vivekananda - February 6 @ 7:30 PM



  • Members: $8

  • Non-Members: $12

Please note you will receive ticket via email from "Aarambh ([email protected])", one day before the event. 


$12.00
[2020-2021] Membership
Price

2020-2021 Family Member

  • Advance ticket purchase for prime events

  • Discounted ticket pricing for all events

  • Discounted child care pricing

  • Talent Show participation

  • Access to "Members only" free events

  • Marathi Shalaa Admission

*** Currently Prorated to $25 (Originally $40) as of December 1st 2020 for the year of 2020-2021 Membership year) ***


$25.00

2020-2021 Individual Member

  • Advance ticket purchase for prime events

  • Discounted ticket pricing for all events

  • Talent Show participation

  • Access to "Member's only" free events

Individual Membership: Only for Senior Singles or Students.*** Currently Prorated to $15 (Originally $25) as of December 1st 2020 for the year of 2020-2021 Membership year) ***


$15.00
Click Here to View Cart                                                      Click Here to Checkout