गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच शनिवारी आणि रविवारी असे २ दिवस आपल्या मंडळाचा नवरात्रीचा उत्सव आणि दांडिया मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. ह्या कार्यक्रमाची क्षणचित्रे https://youtu.be/XZQndT4BZnw या मंडळाच्या YouTube Channel वर आपण पाहू शकता.
मंडळी, हे दिवसच सगळे सणासुदीचे! गौरी-गणपती, नवरात्र झाले की लगेच वेध लागतात ते दिवाळीचे. घरात जशी दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु होते, तशीच आपल्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु होते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची!!
शक्यतो ज्यादिवशी सण असेल त्याच दिवशी तो मंडळाच्या कुटुंबाबरोबर साजरा करण्याची परंपरा कायम राखत यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दि. २२ ऑक्टोबर २०२२ ला आपण दिवाळी पहाट साजरी करणार आहोत.
दिव्यांची रोषणाई करून साजरा होणारा दीपोत्सव, लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही तितकेच हवेहवेसे वाटणारे फटाके, अमृतस्वर – हा स्वातंत्र्योत्तर मराठी चित्रपटगीतांचा कार्यक्रम, दिवाळीचा फराळ, नाश्ता आणि त्यासोबत मित्रमंडळींबरोबर गप्पा !!! कार्यक्रम चालू असताना लहान मुलांना रमता येईल यादृष्टीने विविध गोष्टी आणि खेळ यांची सोय करण्याचा मानस आहे. परंतु, मुले तिथे असताना त्यांची जबाबदारी ही सर्वस्वी त्यांच्या पालकांची आहे.
DFW हिंदू एकता मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:०० वाजता.
मंडळाच्या सभासदांसाठी हा कार्यक्रम मोफत आहे. कार्यक्रमाच्या संयोजनाच्या दृष्टीने ह्या कार्यक्रमासाठी RSVP करणे गरजेचे आहे. खालील लिंकवर RSVP करताना आपल्याकडून नाममात्र किमतीचे तिकीट आकारण्यात येईल आणि कार्यक्रमाच्या उपस्थितीनंतर ही रक्कम आपल्याला परत करण्यात येईल. शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर २०२२ रात्री ९:०० पासून आपल्याला RSVP करता येईल.
RSVP करण्यासाठी लिंक: http://www.dfwmm.org/content/tickets
कार्यक्रमाची रूपरेषा:
सकाळी ६:०० वाजता: नोंदणी सुरु.
सकाळी ६:१५ ते ६:४५: दीपोत्सव
सकाळी ६:४५ ते ७:१५: फटाके आणि आतिषबाजी
सकाळी ७:३० वाजता: अमृतस्वर – स्वातंत्र्योत्तर मराठी चित्रगीतांचा प्रवास.
सकाळी ९:३० वाजता: नाश्ता, फराळ
सकाळी ११:३० वाजता: सांगता.
पार्किंगसाठी मंदिराचे आवारात तसेच मंदिराच्या शेजारी असलेली जागा खालील नकाशात दाखवली आहे. कृपया सभासदांनी या पार्किंगचा वापर करावा.