New memberships for year 2022-23 is open at https://www.dfwmm.org/content/tickets. 

MiBoli Marathi Shala Team

मराठी भाषेची गोडी आपल्या मुलांनाही लागावी म्हणुन २००८ मधे सुरू झालेल्या ‘मायबोली मराठी शाळेत’ आज १४० हून अधिक मुले शिकत आहेत आणि १४ शिक्षक व बरेच volunteers कार्यरत आहेत. वर्षभरात मराठी भाषेच्या अभ्यासाबरोबरच, मराठी आणि भारतीय संस्कृतीशी निगडित इतरही अनेक महत्वाच्या गोष्टी इथे मुलांना  शिकवल्या जातात.

जगभरात आलेल्या कोविड- १९ च्या मोठया संकटातसुद्धा अभ्यासक्रमात कुठलीही तडजोड न करता शाळेतर्फे ऑनलाईन वर्ग चालवले जात आहेत, ज्यासाठी सौ.सोनल धरणगांवकर, सौ रश्मी  देसाई, सौ.सारिका साठये, सौ. शामली असनारे, सौ. नुपूर गोबोले दिवेकर, सौ प्रीती दुर्वे,  सौ.अनघा आगाशे, सौ श्वेता पाटील, सौ.अमृता इनामदार, सौ.स्वाती बोगम जाना, श्री. राहुल पाडळीकर, सौ.माणिक खेडेकर आणि सौ.वैष्णवी आपटे या सर्व शिक्षिका मोलाचे सहकार्य करत आहेत, तसेच सौ.सुवर्णा देशमुख, सौ.पल्लवी मोहरीर या volunteer म्हणून कार्यरत आहेत. वर्षाच्या शेवटी बृहन्महाराष्ट्र मंडळ व भारती विद्यापीठातर्फे परीक्षा घेण्यात येते व मुलांना प्रशस्तीपत्रे ही दिली जातात. 

नवीन युगाशी जुळवून घेत ही आमची मायबोली शाळाही आपले रूप बदलून ऑनलाईन अस्तित्व निर्माण करत आहे. मुलांचा गृहपाठ, गुण (marks), उपस्थिती (attendance), हे सर्व आता पालक व मुले स्कूलॉजीच्या (schoology) माध्यमातून ऑनलाईन बघू शकतात,तसेच काही प्रश्न ,शंका असल्यास ते ही विचारता येतात. तसेच मराठी अभ्यासाची पुस्तके सुद्धा  इथे उपलब्ध आहेत. रवींद्र आपटे, तनया आपटे व पल्लवी मोहरीर यांनी शाळेसाठी ७० च्या वर प्रश्न उत्तरांचे खेळ (क्विझलेट) तयार केले आहेत, ज्यात मुले क्विझ घेऊ शकतात, चूक कि  बरोबर ओळखणे, रिकाम्या जागा भरणे, मराठीचे इंग्लिश किंवा इंग्लिशचे मराठी भाषांतर करणे असे विविध खेळ खेळू शकतात. याचा उपयोग अमेरिकेतील इतर मराठी शाळाही मराठी भाषेच्या सरावासाठी करत आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांना अपडेट आणि आठवण करून देण्यासाठी आम्ही WhatsApp आणि Facebook वापरतो.

मायबोली मराठी शाळेमार्फत अभ्यास व करमणुकीच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि सण यांची ओळख, मराठी बोलण्याचा सराव, या सगळ्या गोष्टींची सांगड घालत यंदा अनेक वेग-वेगळे कार्यक्रम आखले गेले होते. गणेशोत्सवादरम्यान मुलांना शाळेतर्फे गणपतीचे म्युरल्स बनवण्याचे किट देण्यात आले. सौ माणिक खेडेकर, श्री.  राहूल पाडळीकर, सौ.वैष्णवी आपटे यांनी मुलांना ऑनलाईन गणपतीच्या गोष्टी सांगितल्या. दिवाळीसाठी शाळेतर्फे मुलांना दिवा आणि आकाशकंदील बनविण्याचे साहित्य देण्यात आले आणि श्री. चैतन्य जोशी यांनी ‘दिवाळीच्या गप्पा गोष्टी’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिवाळीचे महत्व, गोष्टी आणि दिवाळी कशी साजरी करतात हे सर्व अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगितले.  

पुढच्या कार्यक्रमांची आखणीही झालेली आहे. सौ अर्चना माहिमकर मुलांना वारली कला शिकवणार आहेत, त्याचबरोबर त्याचा इतिहास, संस्कृती याबद्दलही बोलणार आहेत. प्रसिद्ध जादूगार रघुवीर ह्यांचा कार्यक्रम ४ डिसेंबरला आयोजित केलेला आहे. सौ.वैष्णवी आपटे मराठी व्याकरणातील ह्र्स्व-दीर्घांचे नियम मुलांना सोप्या भाषेत समजावणार आहेत, तसेच श्री.सुजित साठे मुलांना शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, गड-किल्ले, याबद्दलची माहिती देणार आहेत. मराठी भाषा आणि हायस्कूल क्रेडिट्स’ या विषयासंबंधित सौ वैष्णवी आपटे दोन सत्र आयोजित करणार आहेत.  

चालू वर्षी मायबोली मराठी शाळेनी, शाळेतील मुलांसाठी  ‘बालहास्यरंग’ या मराठी विनोदी स्पर्धेचे (stand-up comedy) आयोजन केले होते, त्यात मोठ्या वयोगटाने विनोदी स्पर्धेत भाग घेतला तर   लहान वयोगटासाठी गमतीदार गोष्टी सांगितल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी अंकासाठी लेखन, चित्र, कविता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी शाळा मुलांना प्रोत्साहन देत असते व ह्या वर्षी त्याची प्रतियोगिता देखील झाली. 

आत्तापर्यंत डॅलसमधील साधारण चाळीसहून अधिक मुलांनी “Marathi High school credits” याचा लाभ घेतला आहे. Marathi High school credits साठीचे मार्गदर्शन शाळा करते.

शाळेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] वर Email करु शकता. शाळेच्या अधिक माहितीसाठी शाळेच्या वेबसाईट ला भेट दया 

Meet our Team

 

 


सोनल धरणगांवकर
बाल वर्ग

रश्मी देसाई
बाल वर्ग

सारिका साठ्ये
वर्ग १

शामली असनारे
वर्ग १

नुपूर दिवेकर-गोडबोले
वर्ग-१

प्रीती दुर्वे
वर्ग १

अनघा आगाशे
वर्ग २

श्वेता पाटील
वर्ग २

अमृता इनामदार
वर्ग ३

स्वाती बोगम
वर्ग ४

राहुल पाडळीकर
वर्ग ४

माणिक खेडेकर
वर्ग ५

सुवर्णा देशमुख
बदली शिक्षिका

वैष्णवी आपटे
कॉ- ओर्डीनेटर,
शिक्षक
   

अनेक स्वयंसेवक