You are here:   Events > Past Events > 25th Anniversary
Register   |  Login

Lakh Lakh Chanderi - Celebrating 25th Anniversary!

महाराष्ट्राच्या कला-परंपरांचं दर्शन घडविणारा नेत्रदीपक उदघाटन सोहोळा "My मराठी", दिलीप प्रभावळकरांसारख्या प्रख्यात कलावंतांबरोबरच अमेरिका व कॅनडातील गुणवंत कलाकारांचे संगीत, नाट्य, नृत्य यांची रेलचेल असलेले उत्तमोत्तम सात कार्यक्रम, सकाळ- संध्याकाळ  रुचकर भारतीय भोजन आणि लहान मुलांच्या मनोरंजनाची स्वतंत्र व्यवस्था- दोन दिवसांची ही सांस्कृतिक मेजवानी सभासदांना फक्त पन्नास dollars मध्ये!! ही सुवर्णसंधी चुकवू नका!

May 28th and 29th, 2011
At Colleyville Heritage HighSchool
5401 Heritage Avenue, Colleyville, TX


Each ticket will include the following benefits:

1. 2 day entry for up to 7 entertaining programs from local and international artists.

2. 1 Lunch, 1 Dinner, 1 Light Supper and 1 Tea.

3. Child care and entertainment program for kids when tickets for kids are purchased.

4. 'Pratibimb' magazine copy per family!




RSVP event payment and preferred seating for the event is now closed.

The non RSVP rates are indicated below. Please purchase your non-RSVP tickets at the gate.


2-day ticket price at the gate (Non RSVP):

    Member Adult             - $60

    Member Child             - $35

    Non Member Adult     - $65

    Non Member Child     - $45





Here is a tentative program outline, the exact dates and times to be determined.


१. श्री दिलीप प्रभावळकर, मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटांतून गाजलेले एक व्यक्तिमत्व. त्यांचा चिमणराव ते गांधी (मुन्नाभाई फेम) हा प्रवास त्यांच्या या एकपात्री प्रयोगातून ते सादर करणार आहेत. सर्वांना हसतखेळत आणि रमवत ठेवणारा हा कार्यक्रम चुकवू नका!

२. "My मराठी" आपल्या मंडळाचा रौप्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सादर करणार आहेत ४० ते ५० कलावंत. From Dallas! हा सोहळा भव्यदिव्य, डोळे दिपून टाकणारा असेल याबद्दल मुळीच शंका नाही. महाराष्ट्राच्या विविध कला, परंपरा आणि इतिहासाचं भव्य दर्शन दाखवणाऱ्या ह्या सोहळ्याने आपल्या रौप्य महोत्सवाची सुरुवात धूमधडाक्यात होणार आहे. 

३. "इतका बदलला आहे भारत - भाग २" ही एकांकिका Houston चे प्रतिभावंत कलाकार सादर करणार आहेत. ह्या एकांकिकेचा पहिला भाग अमेरिकेत खूप गाजला. Orlando मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ह्या एकांकिकेला Paris मध्ये २००८ साली झालेल्या युरोपीय मराठी संमेलनाचं आमंत्रण सुद्धा मिळालं. आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असणारी व आपल्याला रुचेल अशी ही एकांकिका हेच कलाकार आपल्या समोर सादर करतील.

४. "स्वरगंध" - २००९ साली झालेल्या BMM मध्ये हा कार्यक्रम इतका गाजला की आयोजकांनी त्यांना तिथेच दुसरा प्रयोग करण्याची विनंती केली. नरेंद्र दातार यांच्या कुशल नेतृत्वाखाली Toronto मधली ही मंडळी मराठी भावगीते, चित्रपटगीते, नाट्यसंगीत आणि भक्तिगीतांची मेजवानी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. Dallas रसिंकांची मने हे जिंकतील याबद्दल आम्हांला मुळीच शंका नाही.

५. "मन मनास मोही" - ६-७ गायक, ५-६ कलाकारांचा वाद्यवृंद, नर्तक, नर्तकी आणि audio visual effects नी भरलेला हा orchestra आपल्यासाठी खास घेऊन येताहेत आपले सख्खे शेजारी म्हणजेच Austin मधले कलाकार.

६. Dallas मधले कुशल कलाकार सादर करणार आहेत एक धम्माल कॉमेडी नाटक - चार दिवस प्रेमाचे
 
७. Dallas मधल्या  तीन नृत्यशाळा आपापल्या शास्त्रीय नृत्यावर आधारीत आणि मराठीशी निगडीत कलाकृती सादर करतील.